चंद्रपूर : नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून देण्यास नकार देणाऱ्या लेखापालला महिला मुख्याधिकाऱ्यांनी मारहाण (Accountant beaten by female chief executive ) केल्याची घटना घडली आहे. ही घटना जिवती येथे घडली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल ( Accountant's beating video goes viral ) झाला आहे. कविता गायकवाड असे या महिला मुख्याधिकारीचे ( Kavita Gaikwad Women Chief Officer ) नाव आहे. सागर कुऱ्हाडे असे लेखापालाचे (Accountant Sagar Kurhade ) नाव आहे. सागर कुऱ्हाडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच लेखापालांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत ( Accountant's beating video goes viral ) लेखापाल सागर कु-हाडे यांना थेट कक्षात जाऊन जाब विचारत गायकवाड यांनी टेबलवरील वस्तू त्यांनी फेकून मारल्या. इतर कर्मचारी समजावत असताना मुख्याधिकारी कविता गायकवाड (Women Chief Officer Kavita Gaikwad ) यांनी पुन्हा-पुन्हा टेबलाजवळ येत हल्ला केला. व्हायरल व्हिडीओत गायकवाड आपला 3 महिन्याचा पगार लेखापालाने काढला नसल्याने रागात असल्याचे संभाषणातून स्पष्ट होत आहे.