महाराष्ट्र

maharashtra

चंद्रपूरमध्ये जनता कर्फ्युचा 'वंचित'कडून विरोध; सामान्य माणसाचा रोजगार हिरावण्याचा आरोप

By

Published : Sep 26, 2020, 5:43 AM IST

चंद्रपूरमधील जनता कर्फ्यूचा वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. सामान्य माणसाचा रोजगार हिरावला जात आहे, असा आरोपही वंचितकडून करण्यात आला.

VBA oppose janata curfew in chandrapur
चंद्रपूरमध्ये जनता कर्फ्युचा 'वंचित'कडून विरोध

चंद्रपूर -जिल्ह्यामध्ये वारंवार लागू करण्यात येणाऱ्या जनता कर्फ्युच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. हा जनता कर्फ्यू त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चंद्रपूरमध्ये जनता कर्फ्युचा 'वंचित'कडून विरोध; सामान्य माणसाचा रोजगार हिरावण्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला पहिल्याच दिवशीच विरोध करत वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हा जनता कर्फ्यु असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ही स्थिती नियंत्रणात येत नाही. कारण आरोग्य यंत्रणा तोकडी आहे आणि त्यावर अजून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठी म्हणून सरळ सरळ जनता कर्फ्यु लावण्यात येत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

आजवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा बंदचा प्रयोग केला गेला. मात्र, जनतेने साथ देऊनही कोरोनाच्या संख्येत घट झाली नाही. हा जनता कर्फ्यु लावून जिल्हा प्रशासन गरीबाच्या पोटावर पाय ठेवत आहे. गरीब, कामगार वर्गाचे दिवसाचे आर्थिक गणित असते. आज रोजगार मिळाला तर त्या पैशातून त्याचे कुटुंब अन्न खाईल. मग अशा कर्फ्युच्या वेळी हा गरीब कामगार उपाशी मरेल. म्हणून हा जनता कर्फ्यु त्वरित हटवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी प्रदेश महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, रूपचंद निमगड़े उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details