चंद्रपूर - येथे जिल्हा रुग्णालयात मृतदेह घेऊन येणाऱ्या एका वाहनाने पाच जणांना चिरडले आहे. यात एक महिला ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुमताज शेख असं मृत महिलेचं नाव आहे.
चंद्रपुरात वाहनाने पाच जणांना चिरडले; 1 जागीच ठार, चार गंभीर जखमी - अपघात बातमी चंद्रपूर
गाडीचा चालक नवखा होता. शिवाय त्याने मद्यप्राशन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. रुग्णालय परिससात सकाळी लोकांची वर्दळ होती. यावेळी चालकाने पाच जणांना चिरडले.
हेही वाचा-शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
चंद्रपूर शहरात गोपालपुरी इथं एका महिलेनं आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास तिचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला. एक खासगी गाडीने तो आणला गेला. त्या गाडीचा चालक नवखा होता. शिवाय त्याने मद्यप्राशन केले होते अशी माहिती समोर आली आहे. रुग्णालय परिससात सकाळी लोकांची वर्दळ होती. चालकानं मोठ्या मार्गानं वाहन न काढता अडचणीच्या जागेतून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात पाच जण गाडीखाली चिरडले. यात एक महिला ठार झाली. आरोपी चालकास अटक करण्यात आली आहे.