महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 7, 2021, 9:10 PM IST

ETV Bharat / state

‘मिशन कवचकुंडल’अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात रोज 220 केंद्रांद्वारे होणार लसीकरण

ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 174 लसीकरण केंद्र, शहरी भागात 26 व महानगर पालिका क्षेत्रात 20 अशा एकूण 220 लसीकरण केंद्राद्वारे 44 हजार लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 2 लक्ष 64 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

चंद्रपूर कोरोना
चंद्रपूर कोरोना

चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिकांची कोविड लसीकरणाची गती वाढविण्यासाठी व शत प्रतिशत लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवचकुंडल’ अभियान राबविण्यात येणार आहे.

2 लक्ष 64 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

या अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 174 लसीकरण केंद्र, शहरी भागात 26 व महानगर पालिका क्षेत्रात 20 अशा एकूण 220 लसीकरण केंद्राद्वारे 44 हजार लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 2 लक्ष 64 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

अतिगंभीर आजार होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी

आतापर्यंत जिल्ह्यात 11 लक्ष 83 हजार 896 नागरिकांचा पहिला डोस तर 3 लक्ष 72 हजार 881 नागरिकांचे दोन्ही डोस असे एकूण 15 लक्ष 56 हजार 777 डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या अभ्यासावरून असे निदेर्शनास आले आहे, कोविड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांमुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका फारच कमी असून अतिगंभीर आजार होण्याचे प्रमाण सरासरी 95 टक्क्यांनी कमी झाले आहे.

मृत्युचा धोकाही कमी

कोविड आजारामुळे मृत्युच्या प्रमाणातही सरासरी 95 टक्के धोका कमी होतो. त्यामुळे यापूर्वी लस न घेतलेल्या लाभार्थ्यांनी ‘मिशन कवचकुंडल’ योजनेचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांनीही या मोहिमेंतर्गत लस घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details