चंद्रपूर -महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये झोम्बाझोम्बी आणि शिवीगाळ झाली. यामुळे ही आमसभा गुंडाळावी लागली.
माहिती देताना काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर आणि कंचर्लावार हेही वाचा -Tiger Day ला मुख्यमंत्र्यांनी शेअर केले रुबाबदार वाघाचे स्वतः टिपलेले देखणे PHOTOS
सभेची सुरुवात होताच मनसे सदस्य सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्तेदेखील आमसभेच्या सभागृहात घुसले. मिटिंग ऑनलाईन असताना सदस्य नसताना इतर लोकं कसे घुसले, यावर निषेध नोंदविण्यासाठी पाठोपाठ काँग्रेस सदस्य आले. लेखापरीक्षण अहवालातील 200 कोटींचा अपहार, वीज केंद्रातील दोन संचांचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोविड रुग्णालयाच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले.
हातात निषेधाचा फलक झळकावत काँग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंचर्लावार यांनी या सदस्यांवर नेमप्लेट भिरकावली. त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले. दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचे लक्षात येताच आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्यांनी दोघांना वेगळे केले. यावेळी शिवीगाळ झाल्याचेही चित्रीकरणात ऐकायला येत आहे. शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली.
सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून, प्रश्नही मांडू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला. काँग्रेस सदस्याने महापौरांचा टेबल ठोकला. हे कृत्य महापौर आणि सभागृहाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली.
हेही वाचा -चंद्रपूर वीज केंद्राच्या गेस्ट हाऊसजवळ दोन वाघांचे बस्तान