महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार - अल्पवयीन मुलावर अत्याचार

पीडित मुलगा आणि त्याचा मित्र दोघेही शेतात बकऱ्यांची राखण करत असताना आरोपीने मुलांना तुम्हाला हरभरा देतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने दोन्ही मुलांना दुचाकीवरून आपल्या शेतात नेले होते.

chandrapur
धक्कादायक...! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

By

Published : Mar 16, 2020, 8:37 PM IST

चंद्रपूर - पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यात समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. महादेव उत्तम असे आरोपीचे नाव असून पीडित मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगा (वय 11) आणि त्याचा मित्र (वय 15) हे दोघेही गावाजवळील शेतात बकऱ्यांची राखण करत असताना आरोपी महादेव दोन्ही मुलांजवळ गेला. तुम्हाला हरभरा देतो, असे त्याने या मुलांना सांगितले. आरेपी त्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून स्वतःच्या शेताकडे घेऊन गेला. त्यानंतर त्याने झाडाखाली मोटारसायकल ठेवली आणि त्या दोघांना कपडे काढायला सांगितले. या प्रकाराने मुले धास्ताविली आणि तिथून दोघांनीही पळ काढला.

हेही वाचा -संतापजनक! बापाकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती..

आरोपीने दोघांचा पाठलाग केला. यामध्ये पीडित मुलगा आरोपीच्या तावडीत सापडला. आरोपीने पीडित मुलाला शेतात नेवून त्याचे हात पाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकाराने हादरलेल्या त्या दोघा मुलांनी घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी पीडित मुलासह गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details