महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Two Tiger Cub Died Case : दोन बछड्यांचं मृत्यू प्रकरण; वनविभागाकडून वाघिणीचा पुन्हा शोध सुरू, बछडा नेणार घटनास्थळी - वाघिणीचा शोध

Two Tiger Cub Died Case : चंद्रपूरच्या जंगलात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. वनविभागानं या बछड्यांच्या मृत्यूप्रकरणी वाघिणीचा शोध सुरू केला आहे. आज वनविभागाच्या वतीनं पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

Two Tiger Cub Died Case
घटनास्थळी आढळून आलेला अपंग बछडा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 9:02 AM IST

चंद्रपूर Two Tiger Cub Died Case : बल्लारपूर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कळमना उपविभागात गुरुवारी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याच ठिकाणी एक बछडा जीवंत आढळून आला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात याच परिसरात एक वाघीण मृतावस्थेत ( Tigress Died In Chandrapur) आढळून आली होती. मात्र हे बछडे त्या वाघिणीचे नसावे, असा अंदाज आहे. वनविभागानं वाघिणीचा शोध सुरू केला असून अंधार झाल्यानं गुरुवारी ही मोहीम थांबविली होती. आज सकाळपासून या मोहिमेला पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे.

वनविभागाला आढळलं वाघाचं अपंग पिल्लू :बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत गुरुवारी वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक 572 मध्ये त्यांना वाघाचं अपंग पिल्लू दिसलं. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ या पिल्लाची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवलं. त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता, काही अंतरावर दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. त्यांचं शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. यावेळी वनविभागानं वाघिणीचा शोध घेतला, मात्र वाघिणीचा कुठेही मागमूस आढळून आला नाही.

बछडे आईपासून भरकटले :वाघीण शिकार करण्यासाठी बाहेर निघते, त्यावेळी ती आपल्या बछड्यांना सुरक्षित स्थळी लपवून ठेवते. शिकार झाल्यावर अथवा न झाल्यावर ती नियोजित स्थळी परत येते. मात्र असं करताना बछडे कुठे तरी भरकटले असावे, ज्यामुळे त्यांचा वाघिणीशी संपर्क तुटला अशी दाट शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

दुसऱ्या श्वापदानं बछड्यांना मारल्याची शक्यता :दोन्ही मृत बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यांचा नेमका मृत्यू कशानं झाला हे सांगणं थोडं अवघड असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मात्र, हे बछडे भरकटल्यानंतर त्यांच्यावर जंगली श्वापदानं हल्ला करून मारलं, अशी शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तश्या खाणाखुणा असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बछडा धोक्याच्या बाहेर :वनविभागाला आढळलेल्या बछड्याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. शुक्रवारी तो ठणठणीत झाल्यास, त्याला वाघिणीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आणल्या जाऊ शकते, अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे वाघिणीचा शोध घेणं अधिक सुकर होणार आहे.

शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार मृत्यूचं कारण :पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृत वाघाच्या पिल्लांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही पिल्लांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून, आता शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या पिल्लांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता. या संदर्भात वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

याच ठिकाणी आढळला होता वाघिणीचा मृतदेह : एका महिन्यापूर्वी 30 जुलैला सकाळी बल्लारशाह परिक्षेत्रातील कळमना कक्ष क्र. 572 मधील सामाजिक वनिकरण रोपवाटीकाच्या लगत कुकुडरांझीच्या झुडपात एक वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्या अनुषंगाणं ताडोबा प्रकल्पाचे पशुवैद्यकीय डॉ. कुंदन पोडचेलवार यांना बोलावण्यात आलं. त्यांच्या सोबत वनविभागाच्या चमूनं परिसराची पाहणी केली. सदर झुडपात असलेला वाघीण मृत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Tiger Attack in Sitabani Zone : जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनी वाघिणीला डिवचले, पहा पुढे काय झाले?
  2. Tiger Translocation Program : चंद्रपुरात पकडलेल्या दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवले

ABOUT THE AUTHOR

...view details