चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांचा संपर्कातील एका जावयाने सासुरवाडीत आसरा घेतला. हा प्रकार पुढे आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील गावांत खळबळ उडाली आहे. आता पुन्हा रेडझोन असलेल्या पुणे आणि नांदेड जिल्ह्यातून दोन जावई गावात दाखल झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या दोन्ही जावयांना संस्थात्मक विलगीकरण केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथे हा प्रकार घडला.
जावयांनी वाढवली सासुरवाडीची धाकधूक; रेडझोनमधील दोघे ढाब्यात दाखल - ढाबा जावई न्यूज
कोरोना रुग्णांच्या संपर्कात असणारा एक व्यक्ती काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथे सासुरवाडीत वास्तव्य करुन होता. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाने या व्यक्तीला ताब्यात घेऊन तपासणीसाठी त्याला चंद्रपूरला पाठवले. या जावयाने दिलेल्या धक्क्यातून गाव सावरलेही नव्हते तेच रेडझोन असलेल्या पुणे आणि नांदेड जिल्ह्यातून आणखी दोन जावयांनी शुक्रवारी गावात पाय टाकले.
चंद्रपूरात एकाच वेळी नऊ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. यातील चार रुग्णांच्या संपर्कात असणार एक व्यक्ती मागील तीन दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथे सासुरवाडीत वास्तव्य करुन होता. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाने या व्यक्तीला ताब्यात घेऊन तपासणीसाठी त्याला चंद्रपूरला पाठवले. या जावयाने दिलेल्या धक्क्यातून गाव सावरलेही नव्हते तेच रेडझोन असलेल्या पुणे आणि नांदेड जिल्ह्यातून आणखी दोन जावयांनी शुक्रवारी गावात पाय टाकले. स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे मात्र, गावकऱ्यांची झोप उडाली आहे.