चंद्रपूर :शहरात सुसाट वेगाने पळणाऱ्या कारने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दोघांना उडवले. यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी (One died and one serious ) झाला. ही घटना काल मध्यरात्री जटपुरा गेट मार्गावरील इटनकरच्या पानटपरी जवळ घडला. कार चालवणारे युवक हे मद्यधुंद अवस्थेत (youth driving car is drunk ) वाहन चालवीत असल्याचे समोर आले आहे.
Accident : भरधाव कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू दुसरा गंभीर - Two people were hit by speeding car
जटपुरा वॉर्ड परिसरात कार सुसाट वेगाने आली आणि अनियंत्रित झालेल्या कारने थेट या तरुणांना उडवले. यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी ( One died and one serious ) झाला. कार चालवणारे युवक हे मद्यधुंद अवस्थेत (youth driving car is drunk ) वाहन चालवीत असल्याचे समोर आले आहे.
अनियंत्रित कारने थेट यतरुणांना उडवले :चंद्रपूर शहरात सुसाट वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाणात वाढले आहे. पोलिसांच्या कारवाईचा धाक उरला नसून दिवसेंदिवस ही समस्या शहरात वाढत आहे. अशातच काल रात्री झालेल्या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला आहे. काल रात्री बारा वाजताच्या सुमारास जटपुरा वॉर्ड परिसरातील इटनकर पानटपरी सुरू होती. याच टपरीवर दादू ढोले आणि ओम इटनकर आले होते. टपरीपासून पावलांच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला दुचाकीवर थांबून होते. अशावेळी एमएच 34 व्ही 1999 ही कार सुसाट वेगाने आली आणि अनियंत्रित झालेल्या कारने थेट या तरुणांना उडवले. यात दादू ढोले या मुलाचा मृत्यू झाला तर ओम इटनकर मृत्यूशी झुंज देत आहेत. कारचालक आणि त्यात असलेले तरुण मद्यप्राशन करून असल्याचे समोर आले आहे. विनीत तावाडे आणि शाहिद काझी हे आरोपी करमध्ये होते, कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या पानटपऱ्यांना सूट कशी :जिल्ह्यात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री दहापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र चंद्रपुरात काही निवडक टपऱ्या रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत सुरू असतात. जटपुरा गेट परिसरातील अनेक पानटपऱ्या तसेच रेल्वे स्टेशनजवळ ह्या टपऱ्या बिनधास्तपणे सुरू असतात. अनेक जण मद्य प्राशन करून आलेले असतात, या टपऱ्यांना मुभा कशी यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.