चंद्रपूर - तेलंगाणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे. दोघांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
तेलंगाणातील अपघातात चंद्रपुरातील दोघांचा मृत्यू - chandrapur latest news
तेलंगणातील मंचेरियाल येथे झालेल्या अपघातामध्ये चंद्रपुरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अमोल मल्ला बालुगवार आणि महेश बिरा देवावार, अशी मृतांची नावे आहे.
अमोल आणि महेश दोघेही जेसीबी चालण्याचे काम करतात. तेलंगणातील मंचेरियाल येथे त्यांचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जेसीबीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जेसीबी उभी करून दोघेही दुरुस्तीचे काम करीत होते. त्यावेळी भरधाव येणाऱ्या कारने दोघांनाही धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अमोल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे, तर महेश देवावार याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.