चंद्रपूर - थकीत बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल 50 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जलसंधारण विभागाच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यात चंद्रपूरच्या दोन आणि नागपुरातील एका बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Two officers Arrested for Bribe : 50 लाखांची लाच स्वीकारताना चंद्रपुरातील दोन अधिकाऱ्यांना अटक - चंद्रपुरात 50 लाखांची लाच घेतांना अटक
चंद्रपूरचे विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनी थकीत बिलचे काम करण्यासाठी तब्बल 80 लाखांची मागणी केली. याबाबतची तक्रार नागपूर येथील कंत्राटदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानुसार 2 मे ला ही सौदा पक्का झाला, याची नोंद करण्यात आली. ब्रम्हपुरी येथे ही रक्कम घेण्याचे ठरले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. या आरोपींना तब्बल 50 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
तक्रारदाराने मृद व जलसंधारण कार्यालय जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाच्या बिलाचे बिल आणि उर्वरित बिलाची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र नागपुरातील जिल्हा जलसंधारण तसेच प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजित पाटील, चंद्रपूरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे तसेच चंद्रपूरचे विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनी हे काम करण्यासाठी तब्बल 80 लाखांची मागणी केली. याबाबतची तक्रार नागपूर येथील कंत्राटदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानुसार 2 मे ला ही सौदा पक्का झाला, याची नोंद करण्यात आली. ब्रम्हपुरी येथे ही रक्कम घेण्याचे ठरले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. या आरोपींना तब्बल 50 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.