चंद्रपूर- चिमूर वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे शेतातील विहिरीत दोन अस्वले पडली. गावापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र शंकर निकोसे यांच्या विहिरीत संबंधित प्रकार घडला आहे. विहिरीलगत असलेल्या झाडाची बोरे खाण्याच्या प्रत्नात असताना ही दुर्घटना घडली.
बोरं खाण्याच्या नादात अस्वले पडली विहिरीत; चिमूर वन परिक्षेत्रातील घटना - bears found in well
चिमूर वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे शेतातील विहिरीत दोन अस्वले पडली. गावापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र शंकर निकोसे यांच्या विहिरीत संबंधित प्रकार घडला आहे.
विहिरीत आवाज ऐकू आल्याने मंगळवारी(14जाने) दुपारी तीनच्या सुमारास संबंधित प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तत्काळ चिमूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती दिली. चिमूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. या अस्वलांना काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोन्ही मादी अस्वल असल्याची माहिती मिळत आहे.
अंधार झाल्याने सकाळी या अस्वलांना विहिरीबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राजेंद्र निकोसे यांच्या शेतात वनविभाग कर्मचारी पहारा देत आहेत.