चंद्रपूर - कोळसा व्यापारी राजू यादव याच्या हत्येचा उलगडा झाला आहे. कोळशाची वाहने लावण्याच्या वादातून हा खून केल्याची बाब प्राथमिक कारवाईतून समोर आली आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चंदन सितलाप्रसाद सिंग (वय ३०) जवाहर नगर, रामपूर आणि सत्येंद्रकुमार परमहंस सिंग (वय २८) हनुमान नगर रामपूर अशी या आरोपींची नावे आहेत.
कोळसा व्यापारी राजू यादव हे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सलूनमध्ये गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी दुचाकीवरून फरार झाले होते. मात्र पोलिसांच्या शिताफीने या आरोपींना त्वरित अटक करण्यात आली. घटनेत वापरलेली दुचाकी (एमएच 34 बीटी 2524) आणि पिस्तुल जप्त करण्यात आले. त्यांच्यावर कलम ३०२, ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
वाहने लावण्याच्या वादातून कोळसा व्यापाऱ्याची हत्या; दोन आरोपी अटकेत - देशी कट्ट्यातून झाडल्या गोळ्या
आरोपींनी यापूर्वीच यादव यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास केस कापण्यासाठी आलेल्या राजू यादव यांच्यावर मोटार सायकलवरुन आलेल्या आरोपींनी देशी कट्ट्यातून चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक गोळा झाले तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.
खाणीतील कोळश्याची वाहने लावण्यावरून वाद-
बल्लारपूर वेकोली कोळसा खाणीअंतर्गत राजुरा परिसरात वेकोळीच्या खुल्या व भु-अंतर्गत खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या ठिकाणी कोळशाची वाहतूक करताना व कोळसा उचल करताना वाहनाचा नंबर लवकर लावण्याच्या नादात अनेकदा वाद निर्माण झालेले होते. कधी कधी तलवारींचा वापर करण्यापर्यंत हे वाद विकोपाला गेलेले होते. मात्र यावेळेस आरोपींनी यापूर्वीच यादव यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळच्या सुमारास केस कापण्यासाठी आलेल्या राजू यादव यांच्यावर मोटार सायकलवरुन आलेल्या आरोपींनी देशी कट्ट्यातून चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक गोळा झाले तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.