महाराष्ट्र

maharashtra

Bharat Jodo Yatra : भारत जोडो पदयात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हजार कार्यकर्ते होतील सामील- मुकुल वासनिक

By

Published : Nov 1, 2022, 9:26 AM IST

Updated : Nov 1, 2022, 3:33 PM IST

काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी (Congress leader Rahulji Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो पदयात्रा ( Bharat Jodo Walk from Kanyakumari to Kashmir ) काढली आहे. नोव्हेंबरमध्ये ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे.

MP Mukul Wasnik
खासदार मुकुल वासनिक

चंद्रपूर : काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी (Congress leader Rahulji Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो पदयात्रा ( Bharat Jodo Walk from Kanyakumari to Kashmir ) काढली आहे. 11 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात असणार आहे. या पदयात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हजार काँग्रेस कार्यकर्ते सामील होणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक ( Congress MP Mukul Wasnik ) यांनी दिली.


खासदार वासनिक यांच्या नेतृत्वात नियोजन बैठक पार : नोव्हेंबरमध्ये ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. त्यात नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून हि यात्रा जाणार आहे. देशाच्या इतिहासात ही पहिलीच यात्रा असून यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेला आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेस नेते खासदार वासनिक यांनी पत्रकार परिषदेत केले. आज भारत जोडो यात्रेविषयी काँग्रेस नेते तथा राज्यसभा खासदार वासनिक यांच्या नेतृत्वात नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजूरकर, मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस जेष्ठ नेते विनायक बांगडे, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, सुभाष गौर, प्रफुल खापडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजेश अडूर, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.


भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये : या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहेत. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमन करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Last Updated : Nov 1, 2022, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details