महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मॉर्निंगवॉकला गेलेल्या दोन मित्रांना ट्रकने चिरडले; दोघांचाही जागीच मृत्यू - गडचांदूरमध्ये अपघात

गडचांदूर शहराला लागून असलेल्या खिर्डी गावातील दोन मित्र नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंगवॉकला गेले असता मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघांचाही जागीच मृत्यू
दोघांचाही जागीच मृत्यू

By

Published : Apr 28, 2022, 3:52 PM IST

चंद्रपूर - दोन मित्र नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पुढे जाऊन त्याच ट्रकने आणखी एका पिकअप वाहनाला धडक देऊन पसार झाला. धनराज मालेकर आणि शेखर ढवस असे मृत तरूणांचे नाव आहे. गडचांदूर शहराला लागून असलेल्या खिर्डी गावात ही घटना घडली.

कालच मुलाचा साजरा केला पहिला वाढदिवस - महात्मा गांधी शाळेत शिक्षक असणारे धनराज मालेकर हे खिर्डी या गावी राहत असून त्यांनी कालच आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला. परिवार आनंदात असतानाच सकाळीच त्यांच्यावर काळाने झडप दिली. तर दुसरा शेखर ढवस हा खिर्डी गावातील असून त्याचे मेडिकल स्टोअर्स आहे. दोघेही एकाच गावातील असल्यामुळे दोघे चांगले मित्र होते. दोघेही दररोज सकाळी फिरायला जात असत. आज दोन्ही मित्र फिरायला गेल्यावर मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक

गावकऱ्यांनी रस्ता अडवला - ही घटना गावात व आजूबाजूच्या गावात पसरताच नागरिकांनी गर्दी केली व तब्बल दोन अडीच तास रस्ता अडवून ठेवला. ट्रक चालकास अटक करा अन्यथा दोघांचेही शव उचलणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमरे तपासून ट्रकचा शोध घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस त्या ट्रकचा कसून शोध घेत आहे. तर दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details