चंद्रपूर- गिट्टी भरलेला हायवा ट्रक घरात शिरल्याने घरात खाटेवर झोपून असलेल्या दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे सकाळी ५ वाजता घडली. उमाजी तिवाडे (वय.४०), देविदास वासूदेव झगडकर (वय.४५) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी रास्तारोको केला आहे.
पोंभुर्ण्यात गिट्टीने भरलेला भरधाव ट्रक घरात घुसला; दोन जण चिरडले - pobhurna truck accident
ड्रायव्हरला डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ते सोनटक्के यांच्या घरात शिरले. त्यामुळे पहिल्या खोलीत झोपलेले तिवाडे आणि झगडकर हे ट्रक खाली चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतीच्या कामानिमित्ताने देविदास झगडकर आणि उमाजी तिमाडे हे चेकठाणा येथे आले होते. उशीर झाल्याने ते चेकठाणा येथील त्यांचे नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपले. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. दरम्यान सोनटक्के यांच्या घरातील पहील्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले. तर दुसऱ्या खोलीत सोनटक्के यांचे कुटुंब झोपले होते. दरम्यान, पाच वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा ट्रक विठ्ठलवाड्याकडे निघाला होता. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ते सोनटक्के यांच्या घरात शिरले. त्यामुळे पहिल्या खोलीत झोपलेले तिवाडे आणि झगडकर हे ट्रक खाली चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटस्थळ गाठले आहे.
हेही वाचा-चंद्रपूर महापालिकेला प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्याचाच विसर