चंद्रपूर : टोलनाक्यावर लागणारा कर वाचवण्यासाठी कच्च्या रस्त्याने ट्रॅव्हल्स नेण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. रस्ता अरुंद असल्याने चालकाचे ट्रॅव्हल्सवरचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन-धानोरा मार्गावर घडली. जखमींना राजुरा, चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. छत्तीसगड येथील प्रवाशांना ही ट्रॅव्हल्स हैदराबाद येथे घेऊन जात होती.
हैदराबादला मजूर घेऊन ही ट्रॅव्हल्स जात होती : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशनजवळ छत्तीसगडच्या नावागळ तालुक्यातून हैदराबादला मजूर घेऊन ही ट्रॅव्हल्स जात होती. रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान विरूर ते धानोरामधे ही ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल्सखाली दबून रात्री एका मजुराचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याचा मृत्यू झाला. एकूण 37 प्रवाशांपैकी 17 प्रवाशी जखमी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी काहींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, इथे भरती करण्यात आले आहे.