चंद्रपूर- स्त्रियांनाही ईर्ष्या होईल अशी वेशभूषा, सौंदर्य आणि आत्मविश्वासाची सांगड घालत तृतीयपंथीयांनी एका फॅशन शो मध्ये दिमाखदार रॅम्प वॉक केला. चंद्रपूरच्या आजवरच्या इतिहासात हा पहिलावहिलाच कार्यक्रम होता, ज्यात तृतीयपंथिंना महिला आणि पुरुषाएवढेच स्थान देण्यात आले. कदाचित राज्यातील असा पहिला प्रयत्न असावा. कार्यक्रमात तृतीयपंथीयांनी आपल्या जीवनात आलेली घृणा, तुच्छता आणि उपेक्षेच्या संघर्षमय भावनेला वाट मोकळी करून दिली. यामुळे उपस्थित सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या.
...अन उपस्थितांचे डोळे पाणावले; समाजातील बहिष्कृत तृतीयपंथीयांचे दिमाखदार रॅम्प वॉक
तृतीयपंथी लोकांविषयी समाजात बऱ्याच धारणा आहेत. ते हिंसक असतात, शिव्या देतात, पैसे मागतात असे म्हटले जाते. काही अंशी ते खरेही असेल मात्र त्यांच्या वाट्याला जी घृणा आली ती देणाराही हा समाजच आहे. त्यांना बहिष्कृत करणारा, मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाराही समाजच आहे. हे लोक ही आपलीच आहेत, या भावनेने ग्लॅम आयकॉन 2019 या प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये त्यांना रॅम्प वॉक करण्याची संधी देण्यात आली.
तृतीयपंथी लोकांविषयी समाजात बऱ्याच धारणा आहेत. ते हिंसक असतात, शिव्या देतात, पैसे मागतात असे म्हटले जाते. काही अंशी ते खरेही असेल मात्र त्यांच्या वाट्याला जी घृणा आली ती देणाराही हा समाजच आहे. त्यांना बहिष्कृत करणारा, मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाराही समाजच आहे. हे लोक ही आपलीच आहेत, या भावनेने ग्लॅम आयकॉन 2019 या प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये त्यांना रॅम्प वॉक करण्याची संधी देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक टचवूड संस्थेचे निखिल आसवानी आणि अश्विनी तोमर यांनी सुरुवातीला जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा अनेकांनी नाके मुरडली, टीका केली. हा शो फ्लॉप होणार असेही सांगितले. मात्र, काहींनी याला प्रोत्साहन दिले. अखेर हा कार्यक्रम पार पडला आणि अनेक जण भावनिक झाले. तृतीयपंथीही आपल्या सारखेच आहेत, अशी भावना प्रेक्षकांमध्ये रुजू झाली. त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून या तृतीयपंथीना प्रोत्साहित केले. परिक्षकानी त्यांचे भरभरून कौतुक केले. हे पाहून त्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
या क्रायक्रमात ९ तृतीयपंथानी सहभाग घेतला होता. त्यांच्या घरच्यांनी त्यांना बाहेर हाकलुन दिले. समाजाने ही त्यांचा भयंकर छळ केला. यापैकी काही उच्चशिक्षित आहेत. कोणी बीएससी, बायोकेमीस्ट्री तर कोणी दंतचिकित्सक अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. मात्र, केवळ तृतीयपंथी असल्याने त्यांच्या वाट्याला ही उपेक्षा आली आहे.