महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात कोरोना मृत्यूचा उच्चांक; दिवसभरात 33 मृत्यूसह 1 हजार 577 बाधितांची नोंद - चंद्रपूर कोरोना बातमी

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 46 हजार 446 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 602 इतकी आहे. सध्या 13 हजार 173 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात तब्बल 33 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर 1 हजार 577 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 578 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Apr 21, 2021, 8:19 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज (बुधवारी) या आकड्याने उच्चांक गाठला. तब्बल 33 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर 1 हजार 577 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 578 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 46 हजार 446 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 602 इतकी आहे. सध्या 13 हजार 173 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 41 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 88 हजार 361 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथील 66 वर्षीय महिला, तुकूम येथील 54 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, जलनगर वार्ड येथील 50 वर्षीय व 75 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 51 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 67 वर्षीय पुरुष तर नागभीड येथील 80 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुरझा येथील 60 वर्षीय पुरुष, हनुमान नगर येथील 54 वर्षीय पुरुष, तोरगांव येथील 60 वर्षीय पुरुष, कलेता येथील 57 वर्षीय महिला, पेठ वार्ड येथील 50 वर्षीय महिला, चांदली येथील 45 वर्षीय पुरुष, कोथुळना येथील 38 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 57 वर्षीय महिला, 35 व 45 वर्षीय पुरुष चिमूर तालुक्यातील नेरी येथील 58 वर्षीय पुरुष, भिसी येथील 55 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील संताजी नगर येथील 85 वर्षीय पुरुष , श्रीराम नगर येथील 35 वर्षीय व 69 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, माढेळी येथील 60 वर्षीय पुरुष, अलीनगर येथील 66 वर्षीय पुरुष, नरेंद्र प्रताप नगर येथील 67 वर्षीय महिला, गडचांदूर येथील 50 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील 70 वर्षीय पुरुष, गोंडपिरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 671 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 621, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा तीन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या 1 हजार 577 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 465, चंद्रपूर तालुका 68, बल्लारपूर 131, भद्रावती 136, ब्रम्हपूरी 59, नागभीड 40, सिंदेवाही 24, मूल 30, सावली 08, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 17, राजूरा 50, चिमूर 226, वरोरा 127, कोरपना 147, जिवती 20 व इतर ठिकाणच्या 25 रुग्णांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details