चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 703 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1728 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 52 हजार 840 वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 36 हजार 415 झाली आहे. सध्या 15 हजार 637 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 57 हजार 262 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 98 हजार 428 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज (रविवार) मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 35, 39 व 41 वर्षीय पुरुष, 72 व 55 वर्षीय महिला, ऊर्जानगर येथील 46 वर्षीय पुरुष, ताडाळी येथील 25 वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 62 वर्षीय पुरुष, श्रीराम वार्ड येथील 75 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 68 वर्षीय महिला, घुगुस येथील 57 वर्षीय महिला, वणी येथील 46 व 50 वर्षीय पुरुष, जिवती येथील 56 वर्षीय पुरुष, वरोरा येथील 40, 48, 49, 60 व 63 वर्षीय पुरुष, शेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 64 वर्षीय दोन महिला, बामणी येथील 47 वर्षीय महिला, भद्रावती येथील 54 वर्षीय पुरुष, चिमूर भिसी येथील 47,55 व 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील 60 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 55 व 65 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, तर यवतमाळ येथील 71 वर्षीय महिलेचा व आरमोरी गडचिरोली येथील 32 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.