चंद्रपूर चंद्रपूर शहराला क्रांतिकारक Background of revolutionary history इतिहासाची पार्श्वभूमी Battle of Chandrapur against the British आहे. हे शहर पूर्वी परकोटाच्या आत वसत होते. पठाणपुरा गेट Pathanpura Gate, जटपुरा गेट Jatpura Gate आणि बिनबा गेट Binba Gate हे या शहराचे प्रवेशद्वार आहेत There are entrances to the city. मात्र या द्वारांचे नाव असे का पडले याबाबत अनेकजण अनभिन्न आहेत. मात्र या नावामागे क्रांतीचा इतिहास आहे. ज्या सरदारांनी इंग्रजांशी दोन हात करताना हौतात्म्य पत्करले, अशा थोर सरदारांच्या सन्मानार्थ या द्वारांचे नामकरण करण्यात आले आहे. सन 1818 ला इंग्रजांविरोधात एक मोठी लढाई झाली होती, यात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. आज या ऐतीहासिक घटनेस आज 204 वर्ष पुर्ण होत Today marks 204 years of the Battle आहे. चला जाणुन घेऊया काय आहे इतिहास.
गोंड साम्राज्याचा अस्तचंद्रपूर शहरावर गोंड राजांचे साम्राज्य होते. गोंड राजे आणि भोसले घराण्याचा वाद झाला होता. भोसल्यांसोबत झालेला चंद्रपूरचा तह शेवटचे गोंडराजे निळकंठशहा यांनी पाळला नाही. त्यामुळे रघुजी भोसले यांना 1751 मध्ये चंद्रपूर शहरावर धडक दिली होती. त्यात निळकंठशहा यांचा पराभव झाला आणि त्यांना कैद करण्यात आले. बल्लारपूरच्या किल्ल्यात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. अखेरीस या वैभवशाली राजगोंड राज्याचा अशाप्रकारे अस्त झाला. पहील्या रघुजीने 1751 मध्ये चंद्रपूरचे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले होते. गोंडराजे निलकंठशहाला पेंशन बाधुन दिली होती. नंतर ती पेंशन त्यांच्या वंशात सुरू होती.
युद्धाची पार्श्वभूमीचंद्रपूरच्या वैभवशाली किल्ल्यावर व राज्ज्यावर भोसलेबंधु, पेशवे, निजाम या सर्वांचीच वक्रदृष्टी होती. मधला काळ भोसले भाऊबंदकी मध्येच गेला. यानंतर भोसल्यांचे राज्य सुध्दा इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. त्यांनी 1816 मध्ये तैनाती फौजेचा तह करून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे जानेवारी 1818 च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता.
असे झाले युद्धसन 9 मे 1818 ला कर्नल स्कॉट आणि एडम्स त्यांच्या सैनिकांसह चंद्रपूरला पोहोचले. चंद्रपूरचा किल्ला ताबडतोब आमच्या स्वाधीन करा, उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराकडे म्हणजे जटपुरा दरवाजाकडे दूत पाठवल्याची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले. पण जटपुरा गेटवर तैनात असलेल्या सैनिकांनी त्याला ठार मारले. या घटनेने कॅप्टन स्कॉट हादरला. 2 दिवसांनी स्कॉटने चंद्रपूर किल्ल्यावर हल्ला करायला सुरुवात केली. स्कॉटने आपल्या सैनिकांना माना टेकडी येथे तळ ठोकायला सांगितले होते. तर कोसारा येथेही लष्करी छावणी उभारण्यात आली. 13 मे रोजी स्कॉटच्या सैनिकांनी चंद्रपूर किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. किल्ल्याच्या आत असलेल्या सैनिकांनी इंग्रज सैनिकांशी चार दिवस लढा दिला. भोसलेंच्या फौजांनीही तोफांनी प्रतीहल्ला चढवीला. सतत चार दिवस हे युद्ध सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणि मजबुत असल्याने त्याला भेदने शक्य झाले नाही. प्रथम 400 यार्ड वरून तोफा डागण्यात आल्या, तोवर किल्ला अभंगच होता. नंतर 250 यार्ड वरून 18 पौंडी तोफांचे मोर्चे बांधले गेले. 19 मे ला किल्ला भंगला, त्यास खिंडार पडले. मात्र रात्री हे भगदाड बंद करतील म्हणुन इंग्रजांनी रात्रभर जागता पहारा ठेवत बंदुकांचा मारा सतत सुरू ठेवला. दुसऱ्या दिवशी 20 मे 1818 रोजी या खिंडारातुन इंग्रज सैनिक शहरात आत घुसले. यावेळी गोंडराजांनी देखील आपले सैनिक तयार ठेवले होते. मात्र इंग्रजांच्या रण साहीत्यापुढे त्यांचा काही इलाज चालला नाही. ढासळलेल्या भिंतीतून स्कॉट आणि त्याचे सैनिक चंद्रपूर किल्ल्यात घुसले. या दरम्यान अहेरीचे जमिनदार भुजंगाराव आणि आडपल्लीचे जमिनदार व्यंकटराव, जे चंद्रपूर किल्ला वाचवण्याच्या लढाईत होते ते आपल्या सैनिकांसह अहेरीच्या दिशेने पळून गेले.