महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट; तंबाखू महागली, ५ रुपयांची पुडी तब्बल २५ रुपयाला - chandrapur lockdown

पूर्वी पाच रुपयाला मिळणाऱ्या तंबाखुच्या पुडीसाठी पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत, तर एक रुपयाच्या चुना पुडीला पाच रूपये द्यावे लागत आहेत.

By

Published : May 1, 2020, 10:52 PM IST

चंद्रपूर -कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. बहुतांश कंपन्या बंद असल्याने त्यांचे उत्पादन थांबले आहे. परंतु, मागणी दुप्पटीने वाढली आहे. परिणामी प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. शौकीनांचे मोठेच हाल सुरू आहेत. पूर्वी पाच रूपयाला मिळणारी तंबाखुच्या पुडीसाठी पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत, तर एक रुपयाच्या चुना पुडीला पाच रूपये द्यावे लागत आहेत. जास्त दराने तंबाखू विक्री केली जात असली तरी शौकिन मात्र तलब पूर्ण करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये लहान मोठे व्यवसाय ठप्प झालेत. सीमाबंदीमुळे वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. अशा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असलेल्या व्यावसायिकांनी जवळील वस्तू जादा दराने विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शौकीनांच्या खिश्याला मोठाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. पाच रुपयाला मिळणाऱ्या तंबाखुच्या पुडीला लॉकडाऊनमध्ये तब्बल पंचविस रुपये मोजावे लागत आहेत. एक रुपयाच्या चुनापुडीचा भाव पाच रुपयांवर गेला आहे. दहा ते वीस रुपयाला मिळणारा गुटखा थेट पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे भाव गगनाला भिडले असले तरी खरेदीसाठी शौकीनांची रांग मोठीच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details