चंद्रपूर - राजुऱ्यात आधार जोडणीसाठी संगणक केंद्रचालक तिमाडे यांनी एका गरीब लाभार्थ्याकडून अवैधरित्या पैसे उकळले होते. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चा झाली. यात तिमाडे ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील आहेत त्यांनी ग्रामपंचायतीला विकत घेण्याची भाषा केली. यावर सदर सदस्याला निलंबित करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. त्यामुळे तिमाडे यांना वाचविण्यासाठी काँग्रेस पुढे आली असून दुखावलेल्या इतर सदस्यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांची भेट घेतली आहे.
धाबा ग्रामपंचयातीतील तिमाडे प्रकरण तापले; भाजप आणि काँग्रेस आमने-सामने - शालिनी तिमाडे आधार जोडणी प्रकारण राजुरा
ग्रामपंचायतीत तिमाडे यांना निलंबित करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तिमाडे या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यांना वाचविण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले आहेत. बुधवारला लाभार्थ्यांची भेट घेऊन कोऱ्या कागदावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी घेतल्याची चर्चा आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत धाबा ग्रामपंचायतीला 500 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली. या यादीतील प्रत्येक लाभार्थ्यांची आधार जोडणी करायची होती. यासाठी शासनाकडून कुठलेच देय आकारण्यात आलेले नाही. असे असताना संगणक चालक शालिनी तिमाडे या लाभार्थ्यांकडून 50 ते 100 रुपये घेत आहेत, अशी तक्रार ग्रामपंचायतीला प्राप्त झाली. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. तिमाडे आणि त्यांचे पती सांगडे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे मासिक सभेत चर्चे दरम्यान चांगलाच गोंधळ उडाला. तिमाडे यांनी ग्रामपंचायतीला विकत घेण्याची भाषा वापरली, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
या गोंधळातच तिमाडे यांना निलंबित करण्याचा ठराव घेण्यात आला. तिमाडे या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यांना वाचविण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले आहेत. बुधवारला लाभार्थ्यांची भेट घेऊन कोऱ्या कागदावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतेतील सत्ताधाऱ्यांनी थेट जिल्हा गाठत भाजप नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने उभे झाले आहेत. राजकीय खडाजंगीत गरीब लाभार्थ्यांचे झालेल्या आर्थिक शोषणाचा मुद्दा मात्र दूर फेकला गेला आहे.