चंद्रपूर Tigress killed in Train Collision : रेल्वेच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा (Chandrapur Tiger News) येथील आहे. या रेल्वे मार्गावर यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
रेल्वे मार्ग ठरतोय जीवघेणा :दक्षिण पूर्वमध्य रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी यांचा 1 डिसेंबरला गोंदिया चांदा फोर्ट या रेल्वे मार्गाचा दौरा आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी दौरा करणार होते. ही पाहणी चांदा फोर्ट- नागभीड-गोंदिया या मार्गावर होणार होती. त्यासाठी गोंदियाहून विशेष ट्रेन चांदा फोर्टकडे सुरू होती. ही गाडी नागभीड तळोधी येथील किटाळी-मेंढा येथे आली असताना, एक वाघ रेल्वे मार्ग ओलांडत होता. याचवेळी रेल्वेने वाघाला जोरदार धडक दिली. यात या वाघाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास समोर आली. याबाबतची माहीती वनविभागाला मिळाली. त्यांच्या चमूने पाहणी करून पंचनामा केला, यानंतरचा तपास सुरू आहे.
अशी घडली घटना :रविवारी रात्रीच्या सुमारास एक वाघीण आपल्या तीन बछड्यांसह रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पाणी प्यायला आली होती. मात्र, यादरम्यान रेल्वे आली. दरम्यान, वाघीण रेल्वे रूळ ओलांडत असताना तीन महिन्याची मादा वाघीण रुळावर आली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झालाय.
रेल्वे रुळाच्या बाजूला असलेले खड्डे धोकादायक : रेल्वे रुळाच्या बाजूने अनेक खड्डे आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्यानं अनेक प्राण्यांच्या हालचाली या ठिकाणी होत असतात. अशाच वेळी रेल्वे गेली असता, अनेक प्राण्यांचा यात मृत्यू होतो. ही स्थिती धोकादायक असून, रेल्वे विभागाने हे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी झेप निसर्ग मित्र संस्था, नागभीडचे अध्यक्ष डॉ. पवन नागरे यांनी केली आहे.
रेल्वे मार्ग झाला वन्यजीवांसाठी जीवघेणा : चांदा फोर्ट ते गोंदिया हा रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळं येथून गाडी हळू चालविण्याच्या सूचना आहेत, मात्र, येथून रेल्वे भरधाव वेगानं येते. भरधाव जाणाऱ्या रेल्वेगाडीनं अनेक वन्यजीवांचा नाहक मृत्यू झालाय. यामध्ये वाघांचा देखील समावेश आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2018 ला चीचपल्लीच्या जंगलात रेल्वेच्या धडकेत तीन बछडे मृत पावले होते. यानंतर 1 जून 2020 मध्येही चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर मालगाडीच्या धडकेने 13 रानडुकरांचा मृत्यू झाला होता. यानंतरही तिथं एका वाघाचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटना थांबल्या नाहीत.
हेही वाचा -
- वाघाचा महाराष्ट्र ते ओडिशा प्रवास; चार राज्यं केली पार
- चार राज्यांतून 2 हजार किमीचा प्रवास करुन महाराष्ट्राचा 'रॉयल बंगाल वाघ' पोहोचला ओडिशात; वनाधिकारीदेखील पडले कोड्यात!
- चंद्रपूर परिसरात वाघाची दहशत; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार