महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tigress Found Dead in Bhadravati : भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृतदेह आढळला; करंट देऊन मारल्याचा संशय - वाघिणीचा मृतदेह भद्रावती

भद्रावती तालुक्याच्या परिसरात व शेतशिवारात वाघांचा धुमाकूळ चालू आहे. असे असतानाच सोमवारी कोंढा-चालबर्डी या दोन गावांच्या वेशीवर पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या वाघिणीचा मृत्यू विजेच्या करंटने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ( Tigress Found Dead in Bhadravati )

Tigress Found Dead Bhadravati
भद्रावती तालुक्यात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

By

Published : Jan 4, 2022, 8:05 AM IST

चंद्रपूर - भद्रावती तालुक्याच्या परिसरात व शेतशिवारात वाघांचा धुमाकूळ चालू आहे. असे असतानाच सोमवारी कोंढा-चालबर्डी या दोन गावांच्या वेशीवर पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या वाघिणीचा मृत्यू विजेच्या करंटने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ( Tigress Found Dead in Bhadravati )

रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना याबाबत मिळाली माहिती -

कोंढा आणि चालबर्डी दोन्ही गावांच्या उत्तर दिशेला शिवपांदन रस्ता आहे. चालबर्डी गावापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर एक पट्टेदार वाघीण रस्त्यावरील खड्ड्यात मृतावस्थेत पडून होती. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या चालबर्डी येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. लगेच भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाघिणीचे शव ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठवले.

हेही वाचा -Women suicide :पतीच्या कर्जबाजारीपणामुळे पत्नीची आत्महत्या

भद्रावती तालुक्यात मागील काही महिन्यांपासून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला असल्याचे चित्र आहे. वाघांचा येथे मुक्तसंचार असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन्यजीवांच्या प्रादुर्भावामुळं देखील शेतकरी हैराण आहेत. अशावेळी वन्यजीवांपासून शेतीचे-पिकाचे संरक्षण करण्यासाठी जिवंत विद्युत तारांचा प्रवाह सोडला जातो. यामुळे वाघांचा देखील बळी जातो. सोमवारी मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details