महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक; वृद्धापकाळ, भुकेने मृत्यू झाल्याचा अंदाज

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या लाठी वनक्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. वृद्धापकाळ आणि भुकेने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

chandrapur
वाघिणीचा मृत्यू

By

Published : Nov 27, 2019, 1:36 PM IST

Updated : Nov 27, 2019, 2:13 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या लाठी वनक्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. वृद्धापकाळ आणि भुकेने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वाघिणीचा मृतदेह चंद्रपूरला हलवण्यात आला. आज (बुधवार) शवविच्छेदन करण्यात आले.

वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक; वृद्धापकाळ, भुकेने मृत्यू झाल्याचा अंदाज

हेही वाचा -अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या लाठी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 559 मध्ये वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. वाघीण रोपवाटिकेच्या एका टोकावर असलेल्या नाल्याच्या काठावर धापा टाकत होती. घटनेची माहिती वनविभागाच्या बचाव पथकाला देण्यात आली. परंतु,बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच वाघिणीचा मृत्यू झाला होता. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वाघिणीचा मृतदेह चंद्रपूरला हलवण्यात आला. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले.

वृद्धापकाळ व भुकेमुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याच भागातील पोडसा येथे दोन महिन्यांपूर्वी एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती.

तालुक्यात दोन वाघांचा मृत्यू

वाघांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ असुरक्षित झाले का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. अवघ्या दोन महिन्यात गोंडपिपरी तालुक्यात दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. अशात वनविभागाचा कार्यप्रणालीवर आता शंका उपस्थित केली जात आहे.

Last Updated : Nov 27, 2019, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details