चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला. हा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या मोहुरली गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतारामपेठ या परिसरात हा वाघ मृतावस्थेत आढळून आला.
ताडोब्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघ
चार ते पाच दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले आहेत.
ताडोब्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघ
या वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले आहेत. वाघाचे शवविच्छेदन केले जाईल. यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज शिकारी जाळ्यात अडकून एका बिबट्याचा नाहक जीव गेला. एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने वन्यजीवप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.