महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे वाघाची दहशत; वाघ आणि गावकरी आले समोरासमोर - वाघ दहशत भटाळी गाव चंद्रपूर

जिल्ह्यातील मानव - वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. आज भटाळी गावात थेट वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. सुदैवाने वाघाने हल्ला केला नाही. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

tiger spotted bhatali chandrapur district
वाघ भटाळी

By

Published : Dec 23, 2021, 3:23 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील मानव - वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. आज भटाळी गावात थेट वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. सुदैवाने वाघाने हल्ला केला नाही. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाघाचे दृश्य

हेही वाचा -मृत श्वानाच्या न्यायासाठी 9 वर्षांचा संघर्ष; मग न्यायालयाने दिला हा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ हा काही नवा विषय नाही. प्रत्येक तालुक्यात वाघांचा मुक्तसंचार आहे. ताडोबात जेवढे वाघ आहेत, त्यापेक्षा अधिक आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे, मानव - वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, असे चित्र दिसून येते. पोंभुर्णा, गोंडपिपरी, सावली, ब्रम्हपुरी, भद्रावती, वरोरा या तालुक्यांत वाघांच्या मुक्तसंचारामुळे जनसामान्यांचे जीवन प्रभावित होताना दिसत आहे.

भटाळी गाव हे ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. याच परिसरात कोळसा खाण देखील आहे. या परिसरात वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचा मुक्त वावर आहे. आज इराई नदी शेजारी वाघाने गाईची शिकार केली. ही घटना भटाळीच्या काही नागरिकांना माहिती झाली. थोड्या वेळाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांनी
पाहणी केली असता तिथे वाघ आढळून आला. काही लोकांनी या वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना पाहून वाघ अधिकच चवताळला. वाघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहताच गावकऱ्यांनी काढता पाय घेतला आणि पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हायरल होत आहे. मात्र, गावाच्या वेशीवर वाघ येऊन ठेपल्याने गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा -Nagar Panchayat Election 2021 : कोरपना नगरपंचायत निवडणुकी दरम्यान भाजपाच्या वाहनावर दगडफेक

ABOUT THE AUTHOR

...view details