महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भागो... भागो...शेर आया...! चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन - चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष टोकाला गेला आहे. वाघाने दोन दिवसात दोन बळी घेतले आहेत. अशातच जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील आवाळपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या वसाहतीत शनिवारी सायकांळी 6 वाजण्याच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली.

chandrapur
भागो...! शेर आया है...! चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन

By

Published : Feb 16, 2020, 10:29 AM IST

Updated : Feb 16, 2020, 10:38 AM IST

चंद्रपूर -कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या वसाहतीत वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील वाघाच्या वावरामुळे वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या वाघाच्या हालचालींवर नजर ठेऊन आहे. विशेष म्हणजे वसाहतीला चारही बाजूने संरक्षक भिंत असूनही वाघ या ठिकाणी शिरला आहे.

भागो...! शेर आया है...! चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन

हेही वाचा -वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ताडोबा परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष टोकाला गेला आहे. वाघाने दोन दिवसात दोन बळी घेतले आहेत. अशातच जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील आवाळपूरच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या वसाहतीत शनिवारी सायकांळी 6 वाजण्याच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने वसाहतीत दहशत पसरली आहे. कोरपना तालूक्याजवळ असलेल्या राजूरा तालूक्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला होता. आता कोरपना तालुक्याकडे वाघाने मोर्चा वळविल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा -चिमुरमध्ये भव्य डांन्स कॉम्पिटिशन, सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेचीही सहकुटुंब उपस्थिती

दरम्यान, वाघांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूरात सध्या वाघाचीच चर्चा आहे. जंगलाची सीमा ओलांडून वसाहतीत वाघोबाचा मुक्तसंचार दिसू लागला आहे. भागो...! शेर आया है..! असे ओरडतच नागरिक धावू लागले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वनविभाग वाघाच्या हालतालीवर नजर ठेवून आहे.

Last Updated : Feb 16, 2020, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details