वाघानं केली गाईची शिकार, थरार कॅमेऱ्यात कैद - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात नेहमीच हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. हा संपूर्ण परिसर जंगलाचाच असल्याने येथे वाघ, बिबटे, अस्वल आदी प्राण्यांचा मुक्तसंचार असतो. वीज केंद्राचे मुख्य अभियंता घुगे यांच्या कार्यालयाजवळील नाल्यात मंगळवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास एका वाघाने गाईची शिकार केली.
वाघानं केली गाईची शिकार, थरार कॅमेऱ्यात कैद
चंद्रपूर: येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात एका वाघाने गाईचा फडशा पाडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून यात वाघ गाईची शिकार करताना दिसत आहे.
Last Updated : Nov 13, 2019, 3:16 PM IST