चंद्रपूर Tiger Found Dead : सिंदेवाही तालुक्यातील शेतशिवारात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आलाय. या वाघाचा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शानं झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाघ मृतावस्थेत आढळल्यानं परिसरात चर्चांना उधाण आलंय.
विद्यूत प्रवाहानं वाघाचा मृत्यू : सिंदेवाही शहरापासून दोन किमी अंतरावरील मेंढामाल (मेंढाचक) नियत क्षेत्रातील डोंगरगाव गट नंबर 164 मधील एका यांच्या शेताच्या बाजूला नर जातीचा पट्टीदार वाघाचा मृतदेह आढळून आलाय. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागानं दिलेल्या माहितीनुसार शेतशिवारात आढळलेला मृत वाघाचा विद्युत प्रवाहानं मृत्यू पावला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलाय. घटनास्थळी वन विभाग, विद्युत विभागाची टीम दाखल झाली असून सखोल चौकशी करून एका संशयित व्यक्तीला वन विभागानं अटक केलीय.
घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल : घटनास्थळी वरिष्ठ वनअधिकारी एम बी चोपडे, सहाय्यक वनरक्षक आर एन हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, एन टी सीचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, यश कायरकर मुख्य वनरक्षकचे प्रतिनिधी विवेक करंबेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ सुरपाम, डॉ शालिनी लोंढे, विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर एम गायधने, वनक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, चंद्रपूर विद्युत विभाग अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी पथकासह उपस्थित होते.
महिन्याभरापुर्वी एका वाघाचा झाला होता मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वहानगाव इथं महिन्याभरापुर्वी दोन वाघांची झुंज झाली होती. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. चिमूर तालुक्यातील खडसांगी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वहाणगाव शेतशिवारात दोन वाघांमध्ये झुंज झाली होती. यात एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाला होता. तर एक नर मादी गंभीर जखमी झाली होती. या घटनेचं वृत्त समजताच शेकडो नागरिकांनी वाघांना पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती.
हेही वाचा :
- अभयारण्य घोषित होऊन उलटली सहा वर्षे; मात्र अद्यापही कर्मचारी नियुक्त नाही, इको प्रो संघटनेचं आंदोलन
- रेल्वे ट्रॅकवरील वन्यजीवांचे मृत्यू कमी होणार? वनविभागानं दिला रेल्वेला अहवाल