चंद्रपूर Fight Between Two Tigers : चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील एका शिवारात दोन नर तसंच एका मादी वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झालाय. ही घटना आज उघडकीस आली. या घटनेत मादी वाघ गंभीर जखमी झाल्या आहेत.
एका वाघाचा मृत्यू झाला :मिळालेल्या माहितीनुसा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतावर दोन वाघांची झुंज झाली. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. चिमूर तालुक्यातील खडसांगी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वहाणगाव शेतशिवारात दोन वाघांमध्ये झुंज झाली. यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाला. तर एकन नर मादी गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ही घटना निदर्शनास आली. या घटनेचे वृत्त समजताच शेकडो नागरिकांनी वाघांना पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनास्थळी पंचनामा :खडसांगी प्रादेशिक वनविभागाच्या शेतशिवारात गेल्या दिवसांपासून वाघाच्या संख्येत वाढ झाली आहे. वहानगाव शेतशिवारमध्ये या वाघांनी एका गायीसह सात बैलांचा बळी घेतला. तेव्हापासून या शेतावर वाघ नेहमीच वावरत असतो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चिमूर तालुक्याला लागून आहे. त्यामुळं बफर झोन असो की प्रादेशिक वनविभाग, वाघांच्या हालचाली नित्याच्याच झाल्या आहेत. आज दुपारच्या सुमारास सुभाष दोडके यांच्या शेतावर दोन वाघांची झुंज झाली. ही लढत इतकी चुरशीची होती, की या लढतीत एका वाघाचा मृत्यू झाला. दुसऱ्या वाघाची प्रकृती चिंताजनक होती. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनविभागानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृत वाघाला शवविच्छेदनासाठी खडसांगी वनविभागाच्या केंद्रात पाठवण्यात आलं.
जखमी मादी वाघाचा शोध सुरू : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर तथा गाभा क्षेत्रात वाघाची संख्या कमालीचा वाढली आहे. या वाघांना वनक्षेत्र कमी पडत आहे. त्यातून मानव- वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. आता तर वाघांमध्ये क्षेत्रावर अधिराज्य गाजविण्यासाठी झुंज होत आहे. दोन नर वाघांची झुंज सुरु असताना त्यात मादी वाघसुद्धा सहभागी झाली. या झुंजीत एका नराचा मृत्यू झाला. मादी गंभीररित्या जखमी झाली. मृतक वाघ सुमारे सहा वर्षांचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांनी ही झुंज प्रत्यक्ष बघितली. घटनेची माहीती मिळताच वन परीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, चिमूरचे वन परीक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर कर्मचार्यासह घटना स्थळावर दाखल झाले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. जखमी मादी वाघाचा शोध वन विभागाकडून सुरु आहे.
हेही वाचा -
- Man Animal Conflict 2023 : राज्यात मनुष्य आणि वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात 100 जणांनी गमाविले प्राण
- Water Fountains From Trees: ताडोबातील झाडातून उडाले पाण्याचे फव्वारे; तज्ज्ञांनी सांगितले 'हे' वैज्ञानिक कारण
- Two Tiger Cub Died Case : दोन बछड्यांचं मृत्यू प्रकरण; वनविभागाकडून वाघिणीचा पुन्हा शोध सुरू, बछडा नेणार घटनास्थळी