चंद्रपूर -गस्तीवर असताना वाघाने अचानक केलेल्या हल्ल्यात एका महिला वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा कोअर क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. मृत झालेल्या महिला वनरक्षकाचे आडनाव ढुमने असे आहे.
दबा धरून बसलेल्या वाघाचा अचानक हल्ला -
सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ट्रान्झिट लाईनची कामे सुरू आहेत. त्यामध्येही चार ते पाच किलोमीटर जंगलात कर्मचाऱ्यांना चालावे लागते. आज सकाळच्या सुमारास अशीच गस्त सुरू होती. या दरम्यान ढुमणे नामक महिला गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला ज्यात या महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा - Naxalite Milind Teltumbde's Journey : नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचे चंद्रपूर कनेक्शन; नक्षलवादाची सुरुवात 'अशी'...