महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात दोन बैल ठार; ऐन खरीपाच्या हंगामात जनावरं दगावल्याने शेतकरी अडचणीत - tigers in chandrapur

वनविकास महामंडळ वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वामणपल्ली जंगलात वाघाच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाली आहेत. संबंधित घटना गुरुवारी उघडकीस आली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जनावरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

forest in chandrapur
वनविकास महामंडळ वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वामणपल्ली जंगलात वाघाच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाली आहेत.

By

Published : Jun 25, 2020, 7:51 PM IST

चंद्रपूर - वनविकास महामंडळ वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वामणपल्ली जंगलात वाघाच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाली आहेत. संबंधित घटना गुरुवारी उघडकीस आली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जनावरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या सोनापूर भागातील वामणपल्ली जंगलात मारोती अलोने गुरांचा कळप घेऊन चरण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक वाघाने हल्ला करून दोन बैल ठार केले. गुराखी अलोने यांच्यासमोर हा प्रकार घडला. त्यांनी कळपातील अन्य जनावरांना घेऊन गाव गाठले.

संबंधित घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ठार झालेले जनावर महादेव गुंडावार आणि बंडू गुंडावार यांच्या मालकीचे आहेत. गुरुवारी सकाळी गुराखी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर दोन्ही बैल मृत अवस्थेत आढळून आले. ऐन शेती हंगामात बैल दगावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details