चंद्रपूर - पोंभुर्णा तालुक्यात तीन जणांचा बळी घेऊन दहशत माजवणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. ही वाघीण शिकार करताना एका पाईपमध्ये येऊन अडकली. (The Tiger Caught In Chandrapur District) त्यामुळे वनविभागाने अखेर या वाघिणीला सात तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे.
वाघीण पळून जाताना पुलियात घुसली
पोंभुर्णा तालुक्यात वाघांचा मुक्तसंचार आहे. गेल्या काही दिवसांपासून एका वाघिणीने येथे धुमाकूळ घातला होता. तिच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. (The Tiger Caught In Pombhurna taluka) राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या वाघिणीला त्वरित जेरबंद करण्यात यावे अशा सूचना वनविभागाला केल्या होत्या. (Action of Forest Department In Chandrapur District) गुरुवारी दुपारी या वाघिणीने एक बकरीची शिकार केली. ही माहीती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गावकऱ्यांनी या वाघिणीला पिटाळून लावले. वाघीण पळून जाताना पुलियात घुसली. पुलाच्या पाईपलाईनचा पुढील भाग बंद असल्याने वाघीण तिथेच अडकली. याची माहिती पोंभूर्णा वनविभागाला मिळताच त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली. आणि पाईप मधील जाणारा रस्ता बंद करण्यात आला. वाघीण पुलीयामध्ये असल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणी तिला बघण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती.