चंद्रपूर: जिवती तालुका हा अत्यंत दुर्गम समजला जातो. येथील ताडी हिरापूर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School) आहे. या शाळेतील 49 वर्षीय शिक्षक अच्युत खोबाजी राठोड याने काही अल्पवयीन मुलींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून विकृतपणाचा कळस गाठला.अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत त्यांच्यावर अत्याचार केले. संतापजनक म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्या शिक्षकाने तब्बल 7 मुलींवर अत्याचार ( teacher abused seven girls through out the year) केल्याचे समोर आले आहे.
Abused Seven Girls : नराधम शिक्षकाने वर्षभरात सात मुलींवर केले अत्याचार - Zilla Parishad Primary School
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला (Teacher-student relationship) काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने (Zilla Parishad teachers) आपल्याच सात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार ( abused seven girls ) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या नराधम शिक्षकाने वर्षभरात (through out the year) तब्बल सात मुलींवर अत्याचार केले. ही घटना जिवती तालुक्यातील ताडी हिरापूर येथील असून अच्युत राठोड असे या शिक्षकाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काही पीडित मुलींनी ही बाब आपल्या आईना सांगितली. त्या मुलींच्या आईने त्या शिक्षकाविरुद्ध जिवती पोलीस ठाण्यात तत्काळ तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी तात्काळ कारवाई केली. या प्रकरणी बाललैंगिक अपराध, पास्को यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा: Husband forced for rape : पतीने शेतमालकाला पत्नीवर करायला लावला सामुहिक बलात्कार