चंद्रपूर - वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च करून वनक्षेत्रात खोदतळ्यांची निर्मिती केली. आता याच खोदतळ्यांभोवती कुंपण उभे करण्याचा घाट वनविभागाने घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात हा प्रकार घडला.
चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. येथील वनात विविध प्रजातींच्या वन्यजीवांचा वावर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा शोधात वन्यजीव लोकवस्तीत येत. यामुळे कठडे नसलेल्या विहीरीत पडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या होत्या. यावर उपाययोजना म्हणून लाखो रुपये खर्चून वनविभागाने खोदतळ्यांची निर्मिती केली.