महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Funeral Procession गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा, माजी मंत्री वडेट्टीवारांच्या गावातील घटना - former minister Vadettiwa

गोंडपीपरी तालुक्यातील करंजी गावात ( Karanji village ) स्मशानभूमीच्या मार्गावरील नाल्यावर पुल नसल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा ( funeral procession ) काढावी लागली घटना घडली आहे.

Funeral Procession
अंत्ययात्रा

By

Published : Aug 11, 2022, 7:46 PM IST

चंद्रपूर :गोंडपीपरी तालुक्यातील करंजी गावात ( Karanji village ) स्मशानभूमीच्या मार्गावरील नाल्यावर पुल नसल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली घटना घडली आहे. गावातील रवी आत्राम यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीकडे जात असताना वाटेतील अमराई नाला पाण्याने भरून वाहत होता. अशात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा ( funeral procession through knee-deep water ) काढण्याचा दुदैवी प्रसंग गावकऱ्यांवर ओढावला.

अंत्ययात्रा

पाच हजार लोकसंख्या असलेल्या करंजी गावात स्मशानभूमीचे काम करण्यात आले. मात्र, या मार्गावर नाला आहे. या नाल्यावर पुल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनीवारंवार केली. ग्रामपंचायतीनेही ही मागणी रेटून धरली. मात्र, अद्यापही मागणी पुर्ण झालेली नाही. विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar ) काँग्रेसचे बडे नेते यांचे गावातील हा प्रकार आहे. त्यांच्याच जन्मगावी अशी स्थिती आहे तर दुसरीकडे काय स्थिती असेल अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

हेही वाचा -Pune Crime News पुणे सातारा महामार्गावरचे सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले 8 लाखांची रक्कम लंपास

ABOUT THE AUTHOR

...view details