चंद्रपूर- दहावीच्या निरोप समारंभासाठी निघालेल्या विद्यार्थीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आवाळपुर परिसरात घडली. प्रज्वल ओमप्रकाश राजूरकर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थीचे नाव आहे.
मित्रांच्या भेटीसाठी निघालेल्या विद्यार्थीचा अपघाताच मृत्यू - tenth class student dies in accident at chandrapur
कोरपना तालूक्यातील आवाळपूरच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेत प्रज्वलही शिकत होता. तो निरोप समारंभासाठी दुचाकीवर आवाळपूरला निघाला होता. तेव्हा आवाळपुर-गाडेगाव मार्गावर प्रज्वलच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.
मित्रांच्या भेटीसाठी निघालेल्या विद्यार्थीचा अपघाताच मृत्यू
कोरपना तालूक्यातील आवाळपूरच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेत प्रज्वलही शिकत होता. तो निरोप समारंभासाठी दुचाकीवर आवाळपूरला निघाला होता. तेव्हा आवाळपुर-गाडेगाव मार्गावर प्रज्वलच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.
प्रज्वलचा यात जागीच मृत्यू झाला. हा अपघात गाडेगाव जवळ झाला. प्रज्वलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयात शोककळा पसरली.