चंद्रपूर-जिल्ह्यासहशहरात टप्प्याटप्प्याने जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत होती. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक स्थितीपर्यंत पोहोचला होता. अखेर कोरोना प्रसार रोखण्यासठी जिल्हा प्रशासनाला सक्तीचे पाऊल उचलावे लागले. चंद्रपूर शहरासह उर्जानगर आणि दुर्गापूर या गावात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
2 मे रोजी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. पुढे 50 रुग्णांचा आकडा गाठण्यासाठी 16 जून म्हणजे एक महिना 14 दिवस लागले. यानंतर पुढील 50 चा टप्पा गाठायला अवघे 16 दिवस लागले. 3 जुलैला जिल्ह्यात एकूण 100 रुग्ण पूर्ण झाले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत हा आकडा 150 पर्यंत पोचला तर 14 जुलैला हा आकडा 200 पार झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत किती झपाट्याने वाढ झाली याचा अंदाज येतो. यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला.
लॉकडाऊन लागू करण्याची प्रमुख कारणे
1. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ करणे.
2. रुग्ण वाढीची साखळी तोडणे.
3. संपर्कातून रुग्ण वाढीला आळा घालणे.