चंद्रपूर -क्रिडा स्पर्धेसाठी गेलेल्या ४६ विद्यार्थ्यांना एकाच टेम्पोत बसवून क्रीडा स्पर्धेसाठी नेल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे घडली होती. यावर वेळेवर वाहन न आल्याने विद्यार्थ्यांना टेम्पोने आणावे लागले असल्याचे स्पष्टीकरण शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिले आहे.
पर्यायी वाहन नसल्याने व्यवस्था केल्याचे मुख्याधापकाचे स्पष्टीकरण हेही वाचा - धक्कादायक..! शिक्षकाने एका टेम्पोत बसवले ४६ विद्यार्थी
गोंडपिपरी तालूक्यातील सकमुर येथे बिटस्तरीय क्रिडा स्पर्धा पार पडल्या होत्या. स्पर्धेत गोजोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी शिक्षकाने टेम्पोची व्यवस्था केली. तब्बल 46 विद्यार्थ्यांना जवळपास 12 ते 13 किमी टेम्पोने (छोटा हत्ती) घरी पोहोचवले. याबाबात शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. गोंगले यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणारे वाहन वेळेवर न आल्याने विद्यार्थांना टेम्पोत बसवावे लागले असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक म्हणाले, "तीन दिवसांपासून विद्यार्थी सकमुरला होते. त्यांना नेण्यासाठी ठरवलेले वाहन आले नाही. तसेच बस आणि इतर वाहनही वेळेवर मिळाले नाही. अशावेळी माझ्या ओळखीच्या रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोला थांबवून त्यामध्ये 20 विद्यार्थ्यांना मी बसायला सांगितले. मात्र, घराकडे जाण्याची घाई असल्याने उर्वरित विद्यार्थीही टेम्पोत बसले. तसेच माझ्या मोटारसायकलीवरही मी काही विद्यार्थ्यांना नेले."
हेही वाचा - चंद्रपुरात तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न