चंद्रपूर- जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही ही समाधानाची बाब आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहावी या भावनेतून टाटा ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. टाटा ट्रस्टने जिल्ह्याला अडीच हजार लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या टप्यात दोन हजार लिटर सॅनिटायझर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.
Corona: टाटा ट्रस्टची चंद्रपूर जिल्ह्याला अडीच हजार लिटर सॅनिटायझरची मदत - corona
टाटा ट्रस्टने चंद्रपूर जिल्ह्यासाठी अडीच हजार लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या टप्यात दोन हजार लिटर सॅनिटायझर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. टाटा रॅलीझ आणि टाटा केमिकल्सच्यावतीने टाटा ट्रस्टकडून जिल्ह्याला अडीच हजार लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या टप्यात 2 हजार लिटर सॅनिटायझर जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्यात उर्वरीत 500 लिटर सॅनिटायझर लवकरच देण्यात येणार आहे.
अडिच हजार लिटर सॅनिटायझर उपलब्ध झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुकर होण्यास मोठी मदत मिळणार आहे.