चंद्रपूर -ताडोबात सफर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकरिता आनंदाची बातमी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्र तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ताडोबाचे प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याकरिता 15 एप्रिलपासून ताडोबाचे कोअर क्षेत्र पर्यटनासाठी बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम झाला होता. अनेक स्थानिक लोकांचा ताडोबात येणाऱ्या पर्यटकांवर उदरनिर्वाह अवलंबून आहे. जिप्सीचालक आणि गाईडच्या माध्यमातून येथे स्थानिक रोजगाराला चालना मिळत असते. यापूर्वी बफर क्षेत्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, कोअर क्षेत्र बंद होते.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : तीन वर्षात ताडोबात पाच वाघांची शिकार तर, 32 वन्यजीवांचा मृत्यू
कोरोनाचे सर्व नियम पाळून ताडोबा खुले