महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tadoba National Park : खासदार सुप्रिया सुळेंनी शेअर केला काळ्या बिबट्याचा 'तो' व्हिडिओ - MP Supriya Sule tweet

ताडोबा राष्ट्रीय उद्यान (Tadoba National Park) आणि अंधारी अभयारण्यात विविध प्राण्याचा वावर आहे यामध्ये वाघ, बिबटे, कोल्हे, सिंह आदी. काल (शुक्रवार) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. त्यांनतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक काळा बिबट्या (Black Leopard) दिसत आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटवर Jeet @BeingIndian0104 यांनी 'ताई नशीबवान आहात तुम्ही....ह्याचे दर्शन सहज होत नाही कोणाला...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Tadoba National Park
काळा बिबट्याचा व्हिडिओ

By

Published : Nov 20, 2021, 3:47 PM IST

Updated : Nov 20, 2021, 7:36 PM IST

चंद्रपूर - येथीलताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील (Tadoba-Andhari Tiger Reserve) काळ्या बिबट्याचा (Black Leopard) एक व्हिडिओ हा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शेअर केला आहे. ताडोबा नॅशनल पार्कचे वन्यजीव(Wildlife of Tadoba National Park)हे नेहमीच नजरेस पडत असतात. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी बिबट्याचा व्हिडिओ शेअर केल्याने ताडोबातील वन्यजीवांना बहण्याबाबत प्राणीप्रेमीमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

'ताई नशीबवान आहात तुम्ही'

ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्यात विविध प्राण्याचा वावर आहे यामध्ये वाघ, बिबट, कोल्हे, सिंह आदी. काल (शुक्रवार) खासदार सुप्रिया सुळे या चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. त्यांनतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक काळा बिबट्याचा दिसत आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटवर Jeet @BeingIndian0104यांनी 'ताई नशीबवान आहात तुम्ही....ह्याचे दर्शन सहज होत नाही कोणाला...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ताडोबा नॅशनल पार्कचे वन्यजीव -

महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे 88 वाघ (2018 व्याघ्र गणनेनुसार) आणि भारतीय बिबट्या, आळशी अस्वल, गोरस, नीलगाय, ढोल, पट्टेदार हेयना, लहान भारतीय नाग, वन्य मांजरी, सांबर, हरिण, भुंकणाऱ्या मृग, हे चितळसारख्या इतर सस्तन प्राण्यांचे घर आहे. वन्यजीवांसह, पक्ष्यांच्या सुमारे 195 प्रजाती, फुलपाखरांच्या 74 प्रजाती उद्यानात दिसू शकतात. याशिवाय या उद्यानात स्वँप मगर, भारतीय अजगर यासह अनेक सरपटणारे प्राणी आहेत.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान सफारी -

ताडोबा नॅशनल पार्कचे मुख्य आकर्षण ओपन जिप्सीमध्ये सफारी राइडचा आनंद घेत आहे. म्हणूनच जेव्हा आपण ताडोबा टायगर रिझर्व्हला भेट देता तेव्हा जीप सफारी किंवा हत्ती सफारीचा आनंद घेऊ नका. ताडोबामध्ये सफारी घेणे हा आपल्यासाठी एक सर्वात रोमांचक अनुभव असू शकतो, ज्यामध्ये आपल्याला वाघांसह दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांना भेटण्याची संधी मिळते.

हेही वाचा -House Washed in Flood VIDEO : पुराच्या पाण्यात घर वाहून गेले; पाहा थरारक व्हिडिओ

Last Updated : Nov 20, 2021, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details