चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात महिला गाईडला 'नाईट सफारीवर' पर्यटकांना माहिती देण्यासाठी पाठवले जात नसे. मात्र, व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने 25 डिसेंबरपासून हे क्षेत्र देखील महिलांना खुले केले आहे. पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडवण्यासाठी सात स्थानिक गाईड्स नाईट सफारीसाठी नेमल्या गेल्या आहेत.
ताडोबामध्ये पहिल्यांदाच महिला गाईडला नाईट सफारीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. वन विभागाच्या या मोहिमेत ताडोबा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली गावातील सात महिलांनी मोठ्या उत्साह आणि धाडसाने सहभाग घेतला. २५ डिसेंबरपासून या महिला गाईड जुनोना गेटवरच्या बफर भागामध्ये पर्यटकांसह जात आहेत.