चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडीसोबत तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. मीही या प्रक्रियेत सामील होतो. मात्र, त्यांच्या मागण्या आणि उद्देश हे अवाजवी होते, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत कुठलाही तोडगा निघाला नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
ते एका खासगी कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. बहुजन वंचित आघाडी हे भाजपचे पिल्लू आहे की नाही, हे आताच सांगणे अवघड असले तरी, भाजपकडून असे प्रयत्न नेहमीच होतात. काँग्रेसची मते कापण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित आघाडीच्या हेतूवर अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला. शिंदे आज एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.