चंद्रपूर - जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघातून उभे असलेले भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. जेवढ्या जागा अपेक्षित होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. याची समीक्षा उद्या केली जाईल. कधी-कधी मताच्या विभाजनामुळे किंवा कुठे बंडखोरीमुळे जागा गेल्या असतील या सर्व बाबींचे विश्लेषण केल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल.