चंद्रपूर - माझी भूमिका ही नेहमी युतीचे संबंध चांगले राहावे अशीच राहिली आहे. मी वनमंत्री आहे, वाघ गुरगुरला म्हणजे त्याला सोडायचं नसतं. तर त्याचे संरक्षण आणि संवर्धन करायचे असते, अशी प्रतिक्रिया आज सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मुनगंटीवार यांच्यावर प्रखर टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी वनमंत्री आहे, गुरगुरतो म्हणून वाघाला सोडायचं नसतं; सामनाच्या टीकेला मुनगंटीवारांचे उत्तर - chandrpur latest news
शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज मुनगंटीवार यांच्यावर प्रखर टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा -'राष्ट्रपती राजवटीची धमकी म्हणजे महाराष्ट्राचा अपमान'
जर युती झाली नाही तर नेमकी काय तरतूद आहे? असा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी संविधानातील तरतूद सांगितली. नियोजित वेळात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, असे मी संयुक्तिक विधान केले. ही कुठल्याही प्रकारची धमकी नव्हती. एखाद्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक देत असतो, तर याला धमकी कसे काय म्हटले जाऊ शकते. गेली पाच वर्षे युती कायम राहावी यासाठीच मी प्रयत्न केले असेही मुनगंटीवार म्हणाले.