महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात कोरोनाच्या रुग्णांत अचानक वाढ; आज 70 रुग्णांची नोंद - कोरोना बातमी

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

Sudden increase in corona patients in Chandrapur
चंद्रपुरात कोरोनाच्या रुग्णांत अचानक वाढ

By

Published : Feb 28, 2021, 9:05 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. मागील काही दिवसांपासूनचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

सध्या 323 बाधितांवर उपचार सुरू-

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 674 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 953 झाली आहे. सध्या 323 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 14 हजार 752 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 89 हजार 116 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे-

जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 70 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर तीन, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, मुल पाच, राजुरा एक, चिमूर एक व येथील वरोरा 37 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा-पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details