चंद्रपूर - जिल्ह्यातील राजूरा तालूक्यात येत असलेल्या खैरगुडा येथील सुभाष लक्ष्मण ठाकरे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तलाठ्याने दिलेल्या अहवालानुसार कर्जबाजारीपणातून आत्महत्या झाल्याचे पुढे आले होते. मात्र पती-पत्नीचा वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आणि स्वत: विष प्राशन आत्महत्या केल्याचे आता तपासातून समोर आले आहे. दरम्यान, या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी आहे.
'ती' शेतकरी आत्महत्या नसून पती-पत्नीच्या वादातून झालेली हत्या - शेतकरी आत्महत्या खैरगुडा चंद्रपुर
पती-पत्नीचा वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आणि स्वत: विष प्राशन आत्महत्या केल्याचे आता तपासातून समोर आले आहे. पांढरपौनी येथील तलाठ्याने प्राथमिक अहवालात ही शेतकरी आत्महत्या असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा - कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये टाकून पसार झालेला पती गजाआड
सुभाष व पत्नी संगिता ठाकरे यांच्यात वारंवार भांडण व्हायचे.घटनेच्या दिवशी दोघा पती-पत्नीत भांडण झाले. वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात सुभाषने पत्नी संगितावर वार केले. आरडाओरड होताच मृतकाची आई आणि शेजारी धावून आले. तोपर्यंत संगिता जखमी झाल्या होत्या तर सुभाषने विष प्राशन केले होते. उपचारा दरम्यान सुभाषचा मृत्यू झाला होता. घटनेचा पुढील तपास राजूराचे पोलीस निरीक्षक मुर्लीधर कासार यांच्या मार्गदर्नात प्रशांत साखरे,झुरमुरे,मनोज चालखुरे,हवालदार पंधरे करत आहेत. पांढरपौनी येथील तलाठ्याने प्राथमिक अहवालात ही शेतकरी आत्महत्या असल्याचे म्हटले होते.